Shree Tuljabhavani
Shree Tuljabhavani
Shree Tuljabhavani
MHicon
देवस्थानचे उपक्रम -आराधावाडी वाहनतळ, सौर उर्जा प्रकल्प, शॉपिंग सेंटर, घाटशिळ मंदिर बगीचा, श्री तुळजाभवानी इंजिनिरिंग कॉलेज तुळजापुर, श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

उत्सवाचे महत्त्व


श्रीक्षेत्र तुळजापूर उत्सवाचे महत्त्व खालील प्रमाणे आहे.

श्रीक्षेत्र श्रीच्या सानिध्यात श्रीच्या साक्षीने सर्व सिध्दीयुक्त संस्कार व कुलदैवत आशीर्वाद प्राप्तीसाठी श्रीक्षेत्री लग्न व मौज कार्य केले जाते. एखाद्या अडचणीच्या वेळी या ठिकाणी विवाह करण्यास वेळ, काळ, मुहूर्त, नक्षत्र हे पाहण्याची गरज नाही.

निवासस्थानापासून एक मोठा कणकेचा गोळा दिवा व त्यांमध्ये वात लावून तो दिवा एका छोट्या ताटात ठेवून त्याची विधिवत पूजा करून दीप प्रज्वलित करून सदर ताट डोक्य्यावर ठेवून भाविक मंदिरात येतात व संपूर्ण मंदिरास प्रदक्षिणा मारतात.

प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर सदरचा दिवा होमाचे मागे विसर्जीत करतात. हा पूजा विधी संकल्पसिद्धीसाठी केला जातो. एखादा संकल्प पूर्ण होणार का याचे शंका निरसन असे आहे कि, सदरचा दिवा संपूर्ण प्रदिक्षिणा पूर्ण होईपर्यंत प्रज्वलित राहीला तर संकल्प पूर्ण होणार अशी भाविकांची श्रद्धा आहे.

याठिकाणी श्री देविजींस भाविकाकडून पुरणपोळी, दहीभाताचे नैवद्य दाखविले जातात. श्रीदेविजीच्या पायाखाली असलेल्या महिषासुर या दैत्यास मांसाहारी नैवद्य दाखविला जातो. सकाळी चरणतीर्थाचे वेळी भाजी भाकरी व खीर (पायस) यांचा नैवद्य दाखविला जातो.

सकाळीचे व सायंकाळीचे अभिषेक संपल्यानंतर आरती व धुपारती वेळी ज्या भोपे पुजा-याची पाळी आहे त्याच्या घराचा साखर भाताचा व हैद्राबाद संस्थानचा दोन भाज्या, साधी पोळी, वरण, भाताचा नैवद्य श्रीदेविजींना दाखविला जातो.

प्रक्षाळ पूजेचे वेळी महंत वाकोजी बुवा मठाकडून व हमरोजी बुवा मठाकडून नैवद्य दाखविला जातो.