Shree Tuljabhavani
Shree Tuljabhavani
Shree Tuljabhavani
MHicon
देवस्थानचे उपक्रम -आराधावाडी वाहनतळ, सौर उर्जा प्रकल्प, शॉपिंग सेंटर, घाटशिळ मंदिर बगीचा, श्री तुळजाभवानी इंजिनिरिंग कॉलेज तुळजापुर, श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

सर्वसाधारण माहिती


श्रीक्षेत्र तुळजापूर ट्रस्ट विषयी सर्वसाधारण माहिती खालील प्रमाणे आहे.

 मंदिर व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांचे अध्यक्षतेखाली पदसिद्ध विश्वस्त समिती असून, मंदिर समिती मार्फत, विकासात्मक कामे केली जातात. उदा. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन मंडप बांधकाम / दुरुस्ती करणे, धार्मिक ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय अद्यावत ठेवणे, घाटशिळ मंदिरामध्ये बगीचा विकसित करणे व त्याची देखभाल ठेवणे इत्यादी.

 तसेच श्री देविजींची यात्रा १२ हि महिने चालू असते. यामध्ये मुख्य यात्रा / उत्सव १. शारदीय नवरात्र महोत्सव २. शाकंभरी नवरात्र महोत्सव ३. अश्विनी पोर्णिमा ४. चैत्री पोर्णिमा या होत.

 शारदीय नवरात्र महोत्सव हा श्री देविजीच्या साज-या होणा-या यात्रा उत्सवापैकी महत्वाचा उत्सव असून अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन वद्य १६ या कालावधीत हा महोत्सव साजरा होतो.

 नवरात्रीच्या नऊ दिवसांसह दशमी व कोजागिरी पोर्णिमा या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यासह शेजारील अनेक राज्यातून भाविक श्री देविजींच्या दर्शनासाठी येतात.

 तसेच मंदिरात दररोज नीर निराळ्या प्रकारच्या पूजा होत असतात जसे कि ओटी भरण, अभिषेक पूजा, सिंहासन महापूजा, गोंधळ पूजा, दंडवत, जावळ काढणे इत्यादी.

 मंदीर संस्थान मार्फत भाविकांना निरनिरळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उदा. भक्तांसाठी निवास व्यवस्था, धर्मशाळा, दर्शन पास इत्यादी.